Wednesday, April 23, 2008

औरंगझेब - एक बरबादशहा !

लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी :
"औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर"

वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला ! मी सतत ३ आठवडे अगदी दिवस रात्र एक करून संशोधन करून काही लिहिले ते पुढे मांडत आहे.प्रत्येक माणसाला आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे , त्यामुळे सदरचा लेख हा कुणावरही टीका अथवा कुठल्याही जाती ध्र्माबध्दल अनास्था दाखविण्यासाठी लिहिलेला नाही हे मायबांप वाचकांनी लक्षात घ्यावे अशी कळकळीची "सप्रे"म विनंती !--------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे--------------------------

औरंगझेब - एक बरबादशहा !

१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या !
त्यांची ४०९ वी जयंती असा लेख काही लोकसत्ता मधे वाचायला जास्त आवडले असते !

ज्या औरंगझेबाच्या कबरीच्या फोटोसकट पहिल्या पानावर बातमी दिली गेली , त्या औरंगझेब बध्दल मायबाप वाचकांना अधिक माहिती मिळावी यासाठी हा सर्व ऊहा पोह ! हा लेख मी लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही !

ज्या तैमूरलंगाचे आपण वंशज आहोत असा औरंगझेबाला अभिमान होता, त्या तैमूरलंगा पासूनच आपण सुरुवात करुया.

मानव संहारात (हिडीस) आनंद मानणारा मध्य आशियातील एक संस्कारहीन तुर्क लुटारू म्हणजे तैमूरलंग ! युध्दात पकडलेल्या लोकांची मुंडकी तोडून त्यांचे मनोरे रचण्यात आनंद मानणारा हिडीस मनोवृत्तीचा एक नराधम म्हणजे तैमूरलंग ! दिल्लीवर १३९८ मधे स्वारी केली तेंव्हा त्याच्याजवळ एक लाख युध्द्कैदी होते आणि ते त्याचे गुलाम म्हणून राबण्यास तयार होते. पण , आपण दिल्लीच्या स्वारीत गुंतल्यावर ते बंड करतील या केवळ संशयाने त्याने त्या सर्वांचे शिरच्छेद केले !

माझ्या मूळ लेखात तुर्क लोकांची संपूर्ण वंशावळ मी दिली आहे पण या इथे ती प्रसिध्द केल्यावर नीट दिसत नाहे असे दुसर्‍या एका लेखाच्या वेळी ध्यानात आल्यामुळे ती इथे देत नाहिये. तूर्त आपण खुर्र्म ऊर्फ शाहजहानच्या अपत्यांपासून सुरुवात करू , शाहजहानला इराणी सरदार ऐतेमाद उद्दौला ऊर्फ घियास बेग याचा मुलगा आसफखान याची कन्या मुमताझ महल पासून एकूण १४ अपत्ये झाली ती पुढीलप्रमाणे :

१. मेहेरुन्निसा - ज. १६१३
२. जहाँ आरा - ०२-०४-१६१४ ते १६८१
३. दारा शुकोह - २०-०३-१६१५ ते ३०-०८-१६५९
४. शहा शुजा - २६-०६-१६१६ ते १४-०२-१६५८
५. रोशन आरा - ०३-०९-१६१७ ते ११-०९-१६७१
६. औरंगझेब - २४-१०१६१८ ते २०-०२-१७०७
७. उमेदबक्ष - १८-१२-१६१९ ते १६२१
८. सुरैय्याबानू - १६२१ ते १६२८
९. मुलगा - १६२२ - नामकरणापूर्वीच मृत्यु
१०. मुरादबक्ष - २८-०९-१६२४ ते ०४-१२-१६६१
११. लुत्फुल्ला - ०४-११-१६२६ ते मृत्यु दिनांक अज्ञात
१२. दौलतअब्जा - ०८-०५-१६२८ ते १६२९
१३. मुलगी - २३-०४-१६३० - जन्मतःच मृत्यु
१४. गौहर आरा - १७-०६-१६३१ ते १७०६

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात दोहद येथे २४-ऑक्टोबर १६1८ रोजी जन्मलेला औरंगझेब याने जवळजवळ ५० वर्षे राज्य केलं पण अफाट वैभव , अमर्याद सत्ता असूनसुध्दा आपल्या हेकेखोर , जुलमी आणि संशयी वृत्तीमुळे , ज्या मराठ्यांना संपवायचे स्वप्न उराशी बाळगून तो दख्खनमधे उतरला , त्या दख्खनमधेच नगर येथे - म्हणजेच परमुलुखात त्याला मरण आलं !

या औरंगझेबच्या स्वभावाची आपण ओळख करून घेऊया :

१. लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती.अरबी , फारसी, हिंदुस्थानी आणि तुर्की
भाषेवर प्रभुत्व ! अक्षर सुंदर व वळणदार ! कुरान आणि हादीस तोंडपाठ !

२. धैर्यशाली , धाडसी व साहसी ! याचं एक उत्तम उदाहरण : २८ मे १६३३ - शहाजहानने हत्तींची झुंज लावली होते.ती पहायला औरंगझेब आपले ३ भाऊ दारा, शुजा व मुराद यांच्यासोबत आला होता.झुंज पाहता पाहता तो भान हरपून हत्तींच्या अगदी जवळ आला.तेव्हढ्यात एक हत्ती पिसाळला आणि औरंगझेबवर चाल करून आला.पण औरंगझेब मात्र तिठं ठामपणे उभा राहिला आणि त्याने चालून आलेल्या सुधाकर नावाच्या त्या हत्तीच्या गंडस्थळांत भाला फेकून मारला.तो वार सहन करूनही हत्ती तसाच पुढे आला आणि एका धडकेत त्यानं घोड्यासहीत औरंगझेबला खाली पाडलं.औरंगझेब पुन्हा उठून उभा राहिला.हत्ती इतका जवळ आला होता की , तेव्हढ्या लवकर त्याच्या बचावासाठी कुणीही येणं शक्यच नव्हतं ! कमरेची तलवार खेचून औरंगझेब अंतिम मुकाबल्यासाठी सज्ज झाला.तेव्हढ्यात आपला घोडा फेकत शुजा आला व त्यानं आपल्या भाल्यानं हत्तीला जखमी केलं.राजा जयसिंगानं आपल्या पथकासह धाव घेऊन औरंगझेबला संर्क्षण दिलं.दारूवाल्यांनी चर्कीस ची काही दारू वापरून स्फोट घडवून आणले.यामुळे व आलेल्या बाकी भालाईत लोकांच्या हल्ल्यामुळे सुधाकर घाबरून मागे वळला.ट्यावेळी चिंतातूर बादशहाने लाख मोहोरांचे बक्षिस देऊन त्याची कानौघडणी केली.यावर गुस्ताख औरंगझेब म्हणाला,"हत्तीसारख्या बलाढ्य जनावराशी लढताना मौत आली असती तरी त्यात नाचक्की कोणती होती?मोठमोठ्या शहा सुलतानांच्या आयुष्यावर मृत्यू अचानक पडदा टाकतो.मृत्यूत नाचक्की कसली?त्यात लांज वाटायचं काय कारण?लाज तर त्यांना वाटायला पाहिजे जे अशा प्रसंगी बहादुरी न दाखवतां बुझदिलीनं वागले !" या त्याच्या बोलण्याचा रोख दारा शुकोहवर होता , पण दारा तेंव्हा खरंच खूप दूर होता. हा त्याचा जळका , मत्सरी स्वभाव त्याच्या धाडसाबरोबर मरेपर्यंत कायम होता.

३. औरंगझेब भयंकर क्रूर होता.सत्नामी , शियापंथी, बोहरी , जाट , शीख व मूर्तीभंजनाच्या आड येणारे हिंदू - यांच्या त्याने क्रूर कत्तली केल्या.जून १६८९ मधे विजापूरच्या तुरुंगातील युध्दकैदी म्हणून असलेल्या १०० मराठ्यांपैकी हिंदुराव , बहिर्जी वगैरे पळून गेले म्हणून राहिलेल्या ८० लोकांची त्याने मुंडकी उडवली.आणि हे सर्व केंव्हा , तर "शरण आलेल्या शेकडो मुसलमानांना मराठे खंडणी घेऊन सोडून देत होते" ही पहात असताना !

४. छत्रपती संभाजी सारख्या तख्तनशीन राजाचा अपमानीत अवस्थेत हाल करून वध केला.या प्रकरणात त्याने दाखविलेली हीन अभिरूची केवळ तैमूरलंगालाच शोभणारी होती !

५. औरंगझेबाचा एक वकील इराणचा शहा अब्बास यांजकडे मोठा नजराण घेऊन गेला असतां , शहाने त्याचा अपमान केला , त्याची दाढीही जाळली आणि औरंगझेबाला शिव्या दिल्या व त्याची कुचेष्टा करणारे एक पत्रही त्याच्याजवळ दिले ! औरंगझेबाच्या शियाविरोधी कारवायांमुळे हा प्रसंग उद्भवला.हे हकीकत त्या वकिलाने येवून १६६६ मधे औरंगझेबला सांगितली , परंतु औरंगझेबाची आत्मनिर्भरता एव्हढी भयंकर होती की त्याने त्या वकिलाबध्दल सहानुभूती तर दाखवली नाहीच उलट "तू तेथीच त्याचा खून का केला नाहीस?" असे म्हणून त्या वकिलास सर्पदंश करवून ठार मारले !

६. रमझानचे रोझे चालू असताना औरंगझेबने आग्रा किल्ल्याला वेढा घातला.नंतर खिज्री दरवाजाच्या बाजुनं यमुनेचं पाणी आंत जात असे ते अडवलं.शहाजहानने औरंगझेबला पत्रातून लिहिले,"माझ्या गाझी पुत्रा , झाडाचं पानही खुदाच्या इच्छेशिवाय हलत नाही.पिकल्या पानाला गळून पडण्यासाठी सुध्दा खुदाची इजाजत घ्यावी लागते.नशिबाचा हा क्रूर खेळ त्याच्या मर्जीनेच चालला आहे कांय?कालपर्यंत नऊ लाख सेवकांचा पोशिंदा असलेला हा बादशहा आज थेंबभर पाण्याला महाग झाला आहे.आम्ही ज्यांना काफेर म्हणतो , ते या देशातले हिंदू खरंच धन्य आहेत, जे मेलेल्या माणसाच्याही तोंडात पाणी घालतात आणि आमचा फर्जंद दो स्व्तःला सच्चा मुसलमान म्हणवतो, रमझानच्या महिम्यात पित्याला पाण्यापासून वंचित करतो !
कीर्तीशाली पुत्रा, या फसव्या जगाचा अहंकार धरू नकोस.बुध्दी आणि विचारांचा अहंकार बाळग.हे नाशवंत जग म्हणजे एका निनावी काळोख्या खंडाकडे जाणारा अरूंद मार्ग आहे.शाश्वत सूख आणि वैभव हवं असेल खुदावर ईमान ठेव, मनुष्यमात्रांवर दया दाखव."
पित्यानं कळकळीनं लिहिलेल्या पत्राचं उत्तर औरंगझेबाने एका वाक्यात दिलं : "हे सर्व तुमच्या कुकर्मांचं फळ आहे , तुमचं तुम्ही भोगा !"
यानंतर शरण आलेल्या शहाजहानला औरंगझेबाने कैदेत टाकले-८ जून १६५८.नंतर त्याचे खूप हाल केले व २२ जानेवारी १६६६ ल तो कैदेतच मरण पावला.

७. तत्पूर्वी औरंगझेबनं मुराद आणि शुजाला ठार केलं होतंच.दारा शुकोह व त्याचा १४ वर्षांचा मुलगा सिपिहर शुकोह यांना एका चिखलानं भरलेल्या छोट्या हत्तीणीच्या छत नसलेल्या हौद्यात बसवून रणरणत्या उन्हात दिल्लीतून धिंड काढली.खवासपुर्‍यातल्या जनतेला प्रचंड कणव होती.त्या रीत्री दिल्लीत फाका सुरू झाला, चुली पेटल्या नाहीत !
तुरुंगातून दारानं एक करून व हृदयस्पर्शी पत्र आपल्या दावेदार व शत्रु असलेल्या औरंगझेबला लिहिलं : "हमारे छोटे बिरादर और बादशहा आलम् गीर , राज्य मिळवण्याची इच्छा आता आम्हाला राहिलेली नाही.ही बादशाहत तुम्हांला आणि तुमच्या वारसांना मुबारक ठरो.तुम्ही आम्हाला ठार मारायचं ठरवलेलं आहे.पण हा विचार तुमच्या विचारी मनाला शोभणारा नाही.ही हत्या अनावश्यक आहे.एखादं मकान आणि एक नोकर तुम्ही दिलात तर यापुढचं आयुष्य आम्ही खुदाची याद करत घालवू.आमची निंदा करण्यासाठी तुम्ही आम्हांला काफीर करार दिलांत.आम्हाला त्याचा बिल्कुल राग येत नाही.तुम्ही म्हणतां ते खरंच आहे.या क्षणी आम्ही अशा अवस्थेत आहोत की, निंदा आणि स्तुतीत कसलाही भेद आम्हांस दिसत नाही.खुदा तुम्हाला सलामत ठेवो !"
यावर औरंगझेबाचण दाराला २ ओळींचं उत्तर गेलं : "यापूर्वीही तू हुकूम उदुली केली होतीस.त्याहीवेळी तू राजद्रोह्यांपैकी एक होतांस !"
यानंतर कुली बेग याने ऐरंगझेबच्या सांगण्यावरून दाराला "हलाल" करून ठार मारले.दाराचे कापलेले मुंडके औरंगझेबाकडे पाठविले.औरंगझेबाने , रक्ताने माखलेला तो चेहेरा नीट ओळखता यावा म्हणून ते मुंडके धुवून आणायला सांगितले.ते मुंडके दाराचेच आहे याची खात्री पटल्यावर दाराचे अर्धवट मिटलेले नेत्र गुलामांकडून त्याने पूर्ण उघडायला लावले.आपल्या तलवारीच्या टोकानं मस्तकाला स्पर्श करत तो उद्गारला, "अय् बदबख्त ! तुझे मारकर आज हम यकीनन् गाझी हो गए ! तू जिवंत होतास तेंव्हा तुझं तोंडही पहाण्याची अमची इच्छा नव्हती.आज तुझं तुटलेलं मस्तकही पहाण्याची आमची इच्छा नाही."
यावर तो थांबला नाही."मरणान्तराणी वैराणी" ही उक्ती माणसांसाठी असते ना ! त्याला दाराच्या धडाचीही विटंबना करायची होती.त्यासाठी त्याने दाराच्या धडाची धिंड काढायचे ठरवले.हत्तीच्या पाठीवर दारा शुकोहचं धड उलटं लटकावत ठेवलं.नक्कारे वाजवून कोतवालीचे शिपाई लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेवू लागले.
हत्ती चालू लागला.
तुटलेल्या मानेतून काळपट रक्ताची धार रस्त्यावर सांडू लागली.उंच बांबूवर खोचलेलं दाराचं शीर नाचवत चेले पुढे निघाले.लोक ते दॄष्य बघून दु:खाने काळवंडले.अनेकांची वाचा बसली.दारा मेला याबध्दल लोकांची खात्री पटावी यासाठी ही धिंड काढण्यात आली.आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी जिवंतपणी आणि मेल्यावर गुरुवारी आपल्या सख्ख्या थोरल्या भावाची विटंबना करणारा औरंगझेब लोकांना सैतान वाटला.शहरभर फिरुन धिंड पुन्हा सकाळच्या दोन प्रहरी खवासपुर्‍यांत आली.दाराचं शीर आणि कबंध खवासपुर्‍यांत आणून जोडण्यात आलं.नंतर ते शहाजहानकडे पाठविण्यात आलं.पेटीत आवडत्या दाराचं प्रेत पाहिल्यावर शहाजहान बेशुध्दच पडला.जहाँ आरानं ते प्रेत पाहिल्यावर तिनेही मोठी किंकाळी फोडली.नंतर दाराचं शव हुमयूनच्या कबरीच्या आवारात पुरण्यात आलं !गुस्ल नाही , दुवा नाही, दोन आण्याचं कफनही प्रेताला लाभलं नाही !फातेहा न पढताच मुर्दा खड्ड्यात लोटण्यात आला व मातीनं बुझवण्यात आला.दाराचा मुलगा सुलेमान याला ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकून अफू मिसळलेलं पोस्ता हे पेय देऊन मे १६६२ मधे त्याचा वध करण्यात आला.
दाराच्या मृत्यूच्या आधी तो पकडला जाण्यापूर्वी , देशोधडीला लागलेल्या दाराच्या बायकोचा नादिरा बेगमचा बोलन खिंडीच्या आधी दाधरच्या अलिकडे दोन कोसांवर ६ जून १६५९ रोजी अंत झाला.मलीक जीवनच्या मदतीने शव लाहोरला पाठवलं गेलं.दाराच्या पश्चात् दाराची एक बेगम जुलेखा उदेपुरी जी जॉर्जीयन होती तिला औरंगझेबने आपल्या जनानखान्यांत ओढली.दाराची तिसरी पत्नी रानादिल ही लावण्यवती होती.ती आधी नर्तकी होती.दाराच्या मृत्यूनंतर विमनस्क अवस्थेत त्याच्या कबरीवर फातेहा पढणार्‍या रानादिलच्या सौंदर्यावर औरंगझेब भाळला.त्याने जुलेखाप्रमाणेच तिलाही निकाह लावण्याची लालूच दाखवली.पण रानादिल ही दाराशी एकनिष्ठ व पतिव्रता होती.तिने उलट निरोप पाठवला,"माझ्ह्यातलं तुला काय आवडलंय?"यावर औरंगझेबनं कळविलं,"मला तुझा सुंदर केशकलांप आवडलाय!"तेंव्हा तिने आपले सगळे केस कापून त्याच्याकडे पाठविले आणि कळविलं,"तुला हवं आहे ते घे !"एव्हढ्यानेही औरंगझेब शहाणा झाला नाही.त्याने तिला सविस्तर कळविलं की ,"मला तुझ्याशी निकाह लावायचांय्.तुला काही कमी पडणार नाही.मला दारा समजून तू माझी पत्नी हो !तुझ्या चेहेर्‍याचं सौंदर्य अपूर्व आहे , ते मला हवंय्.तू माझी हो !"
यावर त्या चारित्र्यसम्पन्न रानादिलने आप्ल्या महालात जाऊन सुरीनं सपासप आपल्या चेहेर्‍यावर जखमा करून घेतल्या.भळाभळा वाहणारं रक्त जमा करून औरंगझेबाकडे पाठवून तिने त्याला कळविलं , "तुला माझं सुंदर मुखकमल हवय, पण त्याची आता वाट लागलीय !"
एव्हढं झाल्यावर मूर्ख औरंगझेब शांत झाला !
पुढचं सारं आयुष्य दाराच्या आठवणींवर रानादिल संन्यासिनी प्रमाणे जगली !

८. आपला भाऊ दाराबाबत दाखविलेले हिडेस्स क्रौर्य त्याने परत छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत व कवी कलश यांच्या बाबत पण दाखविले.आपली मुलगी झेबुन्निसा हिला पण त्याने तुरुंगात टाकून तिचे हाल हाल केले.त्याच्याकडून कैद व्हायचा त्याचा मुलगा अकबर एकटा वाचला पण त्यालाहे परागंदा व्हावे लागले व अखेर तो निर्वासित अवस्थेत इराणमधे मरण पावला !
झेबुन्निसा नावाप्रमाणेच "लावण्यलतिका" होती.ती फारच हुषार व चुणचुणीत होती.अल्पवयात सबंध कुराण पाठ करून तिने ३० हजार मोहोरा बापाकडून मिळवल्या होत्या.ती बापाची सर्वांत लाडकी होती पण 'अकबराच्या आपल्याविरुध्दच्या बंडात तिची सहानुभूती अहे' असे समजताच औरंगझेबने तिला कैदेत टाकले , काही वर्षांनी ती कैदेतच मरण पावली.

९. राजा जयसिंग याने दाराशी केलेल्या नमकहरामीमुळे औरंगझेबला बादशाही मिळाली.पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून गेल्यावर त्याला जयसिंग मिर्झाचा संशय आला व त्याने त्यालाही कपटाने विषारी चिलखत वापरावयांस देवून ठार मारले !

१०. वर्षानुवर्षे मोगलांशी ईमान बाळगणार्‍या राजपुतांवर त्यने १६७९ पासून राज्य खालसा करण्यासाठी युध्द सुरु केले.

११. १६६९ मधे औरंगझेबने काशीचे विश्वेश्वराचे देऊळ व ज्याच्या बांधकामाला त्याचा मोठा भाऊ दारा याने मदत केली होती ते मथुरेचे केशव मंदिर त्याने पाडले.या देवळे पाडण्याच्या मोहिमेत ज्या हिंदूंनी विरोध केला, त्यांच्या सरसकट कत्तली केल्या.नंतर त्याने जेजूरीच्या खंडोबाचे व पंढरपूरच्या विठोबाचे देऊळ पण तोडले.

१२. आयुष्यभर त्याने हिंदूंना बाटवून मुसलमान बनविण्यावर भर दिला.मुसलमानांत सुध्दा शिया व सुन्नी असा भेदभाव केला.तुर्क / मोंगल मुसलमानांना तो हिंदुस्थानी मउसलमानांपेक्षा श्रेष्ठ समजत असे.सर्व हिंदूंवर त्याने "जिझिया" कर बसवला.

अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !

कारणे काहीही असोत् , मरणोत्तर त्याने मायमराठीच्या मनावर सत्ता गाजविणार्‍या "लोकसत्ता"मधे प्रथम पॄष्ठावर स्व्तःच्या कबरीच्या छायाचित्रासह झळकून छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर निस्सीम प्रेम आणि श्रध्दा बाळगणार्‍या तमाम मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अढळपद मिळवलंय ! आजच्या २१ व्या शतकांतील ओसामा बिन् लदेन् व सद्दाम हुसैन यांसारख्या जुलूमशहांना व अतिरेक्यांना लाजविणार्‍या अशा या १७ व्या व १८ व्या शतकातील क्रूर , कपटी , नीच व कृतघ्न औरंगझेबाला "या फेब्रुवारीत मरून ३०० वर्षे पूर्ण होणार!" म्हणून मानाचे स्थान देणार्‍या नगरच्या श्री.भूषण देशमुख व लोकसत्ता यांचे कौतुक करायला गेले दोन आठवडे मी शब्द शोधतोंय , पण ते शब्द कुठेतरी रायगडच्या समाधीखाली आणि वढू बुद्रुकच्या समाधीखाली इतके रुतून बसलेत की ते काढताना माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबतच नहियेत !

अरे लांगुल्चालनच करायचे असेल तुम्हाला तर , आमचे राष्ट्रपती व महान संशोधक ए.पी.जे.अब्दुल कलाम किंवा मदारी मेहेतर यांचे करा ना ! या अश्या प्रभृतींबाबत मनांत "धर्म" हा शब्दसुध्दा येत नसेल कुठल्याच हिंदुस्थानी माणसाच्या मनांत !
शेवटी इतकंच म्हणेन :

निंदकाचे घर असावे शेजारी
कपट्यांची मझार असावी "बाजारी"
तिथे जो फुले ठेवून लावेल हजेरी,
तोच गाजवील "लोकसत्ता", बाकी सर्व आजारी !

बा.भ.बोरकर म्हणाले होते,

दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,
तेथे कर माझे जुळती !

आणि आजची ही परिस्थिती पाहून वाटते,

चबुतर्‍यांची जेथ प्रचिती
तेथे "मिंधे" कर जुळती !

कुठेतरी बा.भं,चा आत्मा तळतळला असेलच ना?

कुमार केतकर "मराठी" आहेत असे म्हणायची लाज वाटते आम्हास!

अशा या नरभक्षक , कपटी , कृतघ्न , धर्मांध आणि संशयाचा महामेरूमणी असलेल्या औरंगझेबचा मॄत्यु२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरला झाला.जसा १४ फेब्रुवारी हा व्हॅलेन्टाईन डे म्हणून साजरा करतात तसा, माझ्या मते २० फेब्रुवारी हा दिवस जगात नाहे तर किमान पक्षी हिंदुस्थानात तरी "माणुसकीचा नवा जन्मदिवस " म्हणून साजरा करायला हवा.याबाबत समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळी फारच समर्पक वाटतात :

बुडाला औरंग्या पापी
म्लेंच्छ सम्हार जाहला
मोडिली मांडिली क्षेत्रे
आनंदवनभुवनी !

------------------उदय गंगाधर सप्रे - ठाणे - २१-जानेवारी-२००७.-----------------------------

5 comments:

Unknown said...

You are Simply Great
what a great Job you have done..
Hats Of to you....
kharach..

Pushparaj said...

Nice Article sir why dont u join Orkut..We need ur help on orkut!!!
http://www.orkut.co.in/Profile.aspx?uid=11278394061597990809

My orkut profile link plz join orkut and add me there..

ओंकार घैसास said...

अतिशय अप्रतिम लेख. हा लेख वृत्तपत्रात छापल्यावर होणार नाही एवढा प्रसिद्ध करण्याचा संकल्प करू आपण, माणुसकीचे उपासक म्हणुन!

Zakir (Sikandar -A- Azam) said...
This comment has been removed by the author.
Zakir (Sikandar -A- Azam) said...

वरील ब्लोग चा पुरावा आहे का आपल्या कडे का हि पण कादंबरी समजावी बाकीच्या कादंबरी प्रमाणे